Posts

Showing posts from October, 2020

असेही एक सीमोल्लंघन !

  असेही एक सीमोल्लंघन !  काही दिवसांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन हा शब्द अनेकविध दृष्टीने वाचनात आला. तेव्हाच एक विचार मनात आला, आपल्या जीवनातील अशा काही गोष्टी ज्या खरंतर आपणच आपल्याभोवती आखलेल्या सीमा आहेत. त्या सीमांची जाणीव नसते असे नाही परंतु त्या सीमांसोबत जगण्याची आपण सवय करुन घेतो.  माणूस हे एक अजब रसायन आहे. भावना व विचार हे माणसाला वेगळेपण देते परंतु त्याच भावना व्यक्त करण्यासाठी माणूस अनेकदा विचार करतो. मानवी स्वभाव म्हणू वा सामाजिक दबाव, जेव्हा भावना व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा माणूस एक पाऊल मागे घेतो. अर्थात माणूस अनेकदा स्वतःच भावनांभोवती एक सीमा आखून घेतो जो नकळतपणे त्याच्या जीवनाचा एक भाग होतो.  मानसशास्त्रीय दृष्टीने भावना व्यक्त न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. संशोधनातून असे आढळून आले आहे की जेव्हा आपण आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपण मानसिक आणि शारीरिक लक्षणे अनुभवू शकतो. आपल्या भावना दडपून ठेवणे आपल्या शरीरावरील ताणतणावासदेखील कारणीभूत ठरू शकते. भावना टाळणे देखील स्मरणशक्ती, आक्रमकता, चिंता, नैराश्य इ. अडचणी आणू शकते. मानसशास्त्रीय दृष्टीने भा

सर्वेपि सुखिनः सन्तु , सर्वे सन्तु निरामयः!

  सर्वेपि सुखिनः सन्तु , सर्वे सन्तु निरामयः! गेले काही महिने वर्तमानपत्र असो वा मोबाईल....सगळीकडे एकच चर्चेचा विषय आहे. कोरोना ! बाहेर पडलो वा इतरांच्या संपर्कात आलो तर कोरोना होईल अशी भीती सगळ्यांच्या मनात होती किंबहुना अजूनही आहे. बातम्यांतून समजणार्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांमुळे ती भीती अजूनच बळावत होती . सुरक्षितता म्हणून गेले काही महिने आपण सगळेच घरात होतो. अनेक जण घरुन काम करत होते. आता काही नियम शिथिल केले आहेत तर लहान मुलांचे शालेय शिक्षणदेखील घरुनच सुरु झाले आहे. मास्क , सॅनिटायझर, आवश्यक स्वच्छता इतकेच नाही तर शक्य ते घरगुती उपाय करून सर्वजण शारीरिक आरोग्याची काळजी घेत आहेत. परंतु या सर्व परिस्थितीमुळे आपल्या मनात भावनांचा कल्लोळ झाला आहे. भीती, चिंता, अस्थिरता, चिडचिड, राग अशा अनेक भावना अनेक जण अनुभवत आहेत. तर या मनाची काळजी घेण्यासाठी आपण काय करतो ?  शारीरिक आरोग्याप्रमाणेच आपले मानसिक आरोग्य जपणे गरजेचे आहे. सध्या अनेक हेल्पलाईन मानसिक आरोग्यशी निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत आहेत. नकारात्मक भावनांची झगडताना या हेल्पलाईनद्वारे केले जाणारे ; मानसशास

करिअर निर्णय आणि पालक.

  करिअर निर्णय आणि पालक.  आजकाल पालकांनी मार्गदर्शकाऐवजी मित्राची भूमिका निभावण्याची गरज आहे. पालकांचा मुलांच्या शिक्षण आणि प्रशिक्षण पातळीवर प्रभाव असतो. वेगवेगळ्या व्यवसायांविषयीचे त्यांचे ज्ञान, काही व्यवसायांबद्दल त्यांची मते तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक प्रेरणा व तत्वे मुलांच्या करिअर निर्णयाच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. काही मुले कामाबद्दल पालकांची मते नकळतपणे आत्मसात करतात. त्यांच्या करिअरबद्दल पालकांच्या अपेक्षा नकळत त्यांची स्वतःची निवड बनतात. परंतु जर पालकांच्या अपेक्षा मुलांच्या इच्छांशी जुळत नसतील तर संघर्ष होऊ शकतो. करिअर समुपदेशक बर्‍याचदा अशा परिस्थितीला सामोरे जातात जेव्हा पालक येतात आणि या वाक्यासह संभाषण सुरू करतात - आम्हाला तर हवंय त्याने / तिने ______ व्हावं. जेव्हा ते 'आम्हाला तर हवंय' ; असा शब्द प्रयोग करतात, तेव्हा शीतयुद्ध सुरू होते.  काही पालक अद्याप त्यांच्या मुलांसाठी मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधीची अपेक्षा करत मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रम निवडण्याची इच्छा ठेवतात. जेव्हा मुले काही अन्य करिअर उदा. YouTuber, अशी करिअर निवडतात तेव्हा संघर्ष होतो. परिण