Posts

Showing posts from August, 2021

भावनिक बुध्दिमत्ता : दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्य

Image
  भावनिक बुध्दिमत्ता : दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्य भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे काही एक कौशल्य नव्हे तर ते विविध घटकांचे एकत्रित संयोजन आहे.  दैनंदिन जीवनात करता येणाऱ्या काही सोप्या कृती हे घटक स्वतः मध्ये रुजवून भावनिक बुध्दीमत्तेस पूरक  ठरु शकतात.  डॅनिअल गोलमन यांच्या मते, ‘स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या  जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे,  वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात' तर मेयर  व सोलोव्हे या मानसशास्त्रज्ञांच्या मते, 'भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे व्यक्तीची अशी क्षमता ज्यामुळे भावना समजून  घेता येतात.संभाषणाद्वारे , संदेशाद्वारे व हावभावाद्वारे स्पष्ट होणाऱ्या भावना समजून घेऊन त्याचे योग्य व्यवस्थापन  करून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करता येतात.' एकंदरीत,  भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे भावना जाणून, समजून, त्यांचे व्यवस्थापन तसेच वापर करणे, ज्यामुळे  विचारांना दिशा मिळून कृती करण्यास मार्गदर्शन मिळते. ही सर्व प्रक्