Posts

Showing posts from November, 2020

तमसो मा ज्योतिर्गमय !

  तमसो मा ज्योतिर्गमय !  यंदाची दिवाळी आपल्या सर्वांसाठीच वेगळी आहे. गेले अनेक महिने अनुभवलेली अस्थिरता व नकारात्मकता संपून नव्या प्रकाशमय पर्वाची सुरुवात व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. परंतु आपण हे लक्षात घेऊया की या सर्व गोष्टींमध्ये आपण बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होणारी नकारात्मकता अर्थात नकारात्मक विचार नियंत्रित करुन सकारात्मकतेकडे एक पाऊल उचलू शकतो.नकारात्मक विचार आपल्याला आनंद घेण्यापासून रोखू शकतात, काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्यापासून आपले लक्ष विचलित करू शकतात आणि आपली ऊर्जा कमी करु शकतात.  अनेकदा यामागे कोणत्याही गोष्टीदरम्यान एक किंवा दुसरे टोक असा विचार करणे,  चूक झालेल्या कोणत्याही गोष्टीसाठी आपण दोषी आहोत असे गृहीत धरणे, परिस्थितीची केवळ नकारात्मक बाजू पाहणे, सर्वात वाईट परिणाम होणार आहेत असे गृहीत धरणे अशा विचारपद्धती असू शकतात. आपण त्यांना ओळखू शकलो तर आपण त्यांना आव्हान देण्यास शिकू शकतो.  जेव्हा जेव्हा मनात एखादा नकारात्मक विचार येतो, तेव्हा थांबा आणि तो अचूक आहे की नाही याचे मूल्यांकन करा. स्वतःला विचारा की आपण सर्वात वाईट होईल असे गृहित धरत आहात वा आप